सोशल मिडिया होत आहे सहासाचे कौतुक व्हायरल होत आहे खालील लिखाण
इतिहास घडविला तो नगरच्या कामरगावमधील तानाजी या पठ्ठ्याने,हाताने गळा दाबून वाघाला ठार केले....!
घालुनी जबड्यात हात मोजीती दात हि जात मराठ्याची..!शेवटी आम्ही उगच म्हणत नसतो, "एक मराठा लाख मराठा"मराठ्यांचा नाद वाघ पण करत नसतो ,पहा एका मराठ्याचा नाद एका वाघाने केला ...आणि उगचच जिवाशि मुखला,म्हणुन म्हणतो मराठ्यांचा नाद करायचा नाय...!हर हर महादेव.!जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय शंभो,जय भवानी,जय महाराट्र....!आणि शेवटी "जय मराठा"


नगरी "पारनेर"
शंभू राजेंनी वाघाचा जबडा फाडून त्याचे दात मोजल्याचा इतिहास ताजा आहे. असाच इतिहास घडविला तो कामरगावमधील तानाजी या पठ्ठ्याने ! सदर बिबट्याने दुपारी एक वाजता दोन महिलांवर हल्ला केला. त्यानंतर सदर बिबट्याने दुसरा हल्ला चढविला तो या तानाजीवर! पण, निधड्या छातीच्या तानाजीने बिबट्याला प्रतिकार केला आणि त्याची मानगुट दाबून धरली. यानंतर ग्रामस्थ जमा झाले आणि ते तानाजीच्या मदतीला धावले.


पुणे रस्त्यावरील कामरगाव हद्दीतील स्माईल स्टोनजवळ बिबट्याने या इसमावर हल्ला केला असता त्याने त्यास प्रतिकार केला आणि त्या बिबट्यावर झडप घातली. बिबट्याने त्यास चावा घेतला. तरीही त्याने त्याची मानगुट सोडली नाही. जवळपास अर्धा तास या पठ्ठ्याने त्या बिबट्याच्या मानेला घट्ट दाबून ठेवले आणि मदतीसाठी आरडा ओरडा केला. बाजूलाच असणार्‍यांना त्याचा आवाज आला आणि समोर बिबट्याला हाताच्या मिठीत घट्ट धरलेला हा पठ्ठ्या पाहून सर्वांचीच भंबेरी उडाली. सारेजण त्याच्या मदतीला धावले. बिबट्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होता. गर्दी जमत होती तसा बिबट्या उसळी मारत होता. बिबट्याच्या मानेवर काहींनी लाकडी दांडके दाबून धरले. दरम्यान, जखमी झालेला प्रति शंभू महाराजाला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. संतप्त जमावाच्या मारहाणीत बिबट्या निपचीत पडला. वन अधिकार्‍यांनी त्यास हलविले. सदरच्या बिबट्याने गेल्या महिनाभरापासून कामरगाव व परिसरात प्रचंड दहशत केली होती. चार- पाच दिवसांपूर्वीही या बिबट्याने महिलेवर आणि एका मुलीवर झडप घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून सहीसलामत वाचले होते.
जवळपास एक तास हा थरार चालू होता आणि त्यामुळे पुणे रस्त्यावर स्माईल स्टोन परिसरात वाहनांची प्रचंड रांग लागली होती. हजारोंच्या नजरांनी हा थरार पाहिला आणि या अनोख्या धाडसी शंभू राजाचे कौतुक केले.